Ad will apear here
Next
‘पुन्हा एक दिवस हायस्कूलचा’
तीस वर्षांनी पुन्हा एकदा शाळेत जमलेली कुडाळ हायस्कूलची १९८७-८८ची दहावीची बॅच

कुडाळ : कुडाळ हायस्कूलमधील १९८७-८८च्या दहावीच्या बॅचने तीस वर्षांनंतर ‘पुन्हा एक दिवस हायस्कूलचा’ अनुभवला. अगदी शाळेच्या प्रार्थनेपासून ते थेट वर्गातील धूमशानापर्यंतच्या सर्व गोष्टी करून या एका दिवसात या सर्वांनी आपले बालपण पुन्हा एकदा अनुभवले. आपल्या सर्व गुरुवर्यांचा सत्कार करून त्यांचे आशीर्वादही त्यांनी घेतले.

सगळे विद्यार्थी शिक्षकांसह मिरवणुकीने शाळेत दाखल झाले.आपण कितीही मोठे झालो, वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झालो तरी शालेय जीवनातील मौज काही वेगळी असते. आपली शाळा आणि शाळेतील ते सोनेरी दिवस कोणी विसरू शकत नाही; पण काळ कधी थांबत नाही. सरलेले दिवस पुन्हा येत नाहीत. तरीही कुडाळ हायस्कूलच्या १९८७-८८च्या दहावीच्या बॅचने शाळेतील त्या आठवणी तब्बल तीस वर्षांनी पुन्हा जागवल्या ‘एक दिवस हायस्कूलचा’ या उपक्रमाद्वारे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मीना देसाई यांनी या बॅचच्या काही मित्र-मैत्रिणींचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला. अनेक मित्र-मैत्रिणी हळूहळू या ग्रुपमध्ये सहभागी होत गेले आणि ‘गेट टुगेदर’ची संकल्पना पुढे आली. दिवस ठरला रविवार, १४ मे.
 
गुरुवर्यांचा सत्कार करण्यात आला.
त्या दिवशी सकाळपासूनच कुडाळ हायस्कूलचे आवार या विद्यार्थ्यांनी फुलू लागले होते. दूर दूर गेलेले सर्व जण एकमेकांना भेटत होते. सेल्फी काढत होते. सर्वांचा एक युनिफॉर्म ठरला होता. मुलांसाठी कुर्ता आणि मुलींसाठी साडी आणि सर्वांच्या डोक्यावर मराठमोळा फेटा. गळ्यात ओळखपत्र. सर्वांचा नाश्ता झाल्यावर ढोलावर काठी पडली. ताशा कडाडू लागला आणि मिरवणुकीने सर्व जण शिक्षकांसोबत प्रार्थनेच्या ठिकाणी गोळा झाले. शाळेत असताना व्हायची तशी घंटा वाजली. सर्व जण एका रांगेत उभे राहिले. तेव्हाचे मुख्यध्यापक का. आ. सामंत यांनी सूचना दिल्या आणि सावधान-विश्राम झाल्यावर राष्ट्रगीत आणि प्रार्थनासुद्धा झाली. त्यानंतर शाळेच्या आवारातील नाना-नानी पार्कला या साऱ्यांनी भेट दिली. अगदी लहान होत तिथल्या खेळण्यांचा आनंदही घेतला. मग शिक्षकांसोबत एक ग्रुप फोटो काढण्यात आला. नंतर सारे एका हॉलमध्ये जमले. हॉलच्या भिंतीसुद्धा विद्यार्थ्यांचा नावांनी कलात्मकरीत्या सजल्या होत्या. औक्षण करून आणि फुले उधळून शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. नितीन मुतालिक यांच्या तबलावादनाने आणि कथ्थक नृत्यांगना प्रीती सावंत-शिंदे यांनी सादर केलेल्या गणेशवंदनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली. उपस्थित नसलेल्या डॉ. शिरीष शिरसाट यांच्यासारख्यांनी थेट परदेशातून व्हिडिओच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. काहींनी पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या होत्या. या वेळी उपस्थित गुरुजनांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू आणि मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. काही विद्यार्थ्यानी आपल्या मनोगतातून शालेय जीवनातील आठवणी जागवल्या. नरेंद्र पडते यांनी तर या सर्वांवर कविताही केली. त्यानंतर शिक्षकांनीही या बॅचच्या आठवणी जागवून विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिले.

सर्वांनी बच्चेकंपनीसह गाण्यावर ठेकाही धरला.या कार्यक्रमासाठी मकरंद अणावकर, मीना देसाई, आनंद मर्गज, प्रसाद दळवी, अमोल सामंत, प्रीती सावंत, एस. व्ही. राणे, दीपक कदम या साऱ्यांनी मेहनत घेतली होती. शाळेनेही या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव केला. विद्यार्थ्यांनी या वेळी आपली ओळख करून देताना शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. मीना देसाई-घुर्ये, अॅड. अमोल सामंत, अंजली काणेकर, प्रीती सावंत-शिंदे यांच्यासह त्यांच्या बच्चेकंपनीनेही बहारदार नृत्ये सदर करून उपस्थितांना ताल धरायला लावला. ‘यारो दोस्ती बडी ही अजीब’ या गाण्यावर मग सारेच जण ठेका धरत एकत्र आले.  तब्बल तीस वर्षांनंतर भरलेल्या या वर्गाची तिथेच मधली सुट्टी झाली; पण त्यानंतर शेवटचे तासही खेळण्या-बागडण्यात कधी गेले ते कळलेच नाही. पुन्हा एकदा भेटायचे वचन एकमेकांना देत हायस्कूलचा तो एक अनोखा दिवस सरला होता.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZFFBC
Similar Posts
‘हम साथ साथ हैं!’ कुडाळ : कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या १९८९-९०च्या कॉमर्सच्या बॅचचे विद्यार्थी तब्बल २७ वर्षांनी एकत्र आले. फक्त एकत्र जमून मौजमजा न करता पन्नाशीकडे झुकलेल्या सर्वांनीच एकमेकांच्या सुख-दु:खात साथ देण्याचा आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी कायमस्वरूपी एक निधी उभारण्याचा निश्चय या सर्वांनी केला
‘पुलं’चे कर्तृत्व हा राज्याचा सांस्कृतिक इतिहास कुडाळ : ‘‘पुलं’चे जीवन आणि कलाकर्तृत्व हा महाराष्ट्राचा अर्धशतकी सांस्कृतिक इतिहास आहे. लेखक, नट, नाटककार, संगीतकार, एकपात्री नट, पटकथाकार, संवादिनीवादक, निर्माता, संगीतकार, दशसहस्रेषु वक्ता आणि कर्णासारखा दाता मराठी मनाने केवळ ‘पुलं’मध्ये पाहिला,’ असे उद्गार ‘कोमसाप’च्या मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी काढले
रंगूनवाला इन्स्टिट्यूटच्या ग्रंथालय कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद पुणे : एम. सी. इ. सोसायटीच्या एम. ए. रंगूनवाला इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड रिसर्च यांच्या वतीने १२ डिसेंबर २०१८ रोजी ग्रंथालयविषयक कार्यशाळा (लायब्ररी एक्सटेन्शन अॅक्टिव्हिटी) मावळ तालुक्यातील चिखलसे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत घेण्यात आली.
निराधारांना ‘जीवन आनंद’ देणारा संविता आश्रम जीवन आनंद या सामाजिक संस्थेमार्फत पणदूर (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथे संविता आश्रम चालविला जातो. समाजातील असहाय, निराधार, मतिमंद अशा समाजाने नाकारलेल्या लोकांसाठी तो एक भक्कम आधार ठरला आहे. राजाश्रयाविना केवळ लोकाश्रयावर ही संस्था खऱ्या अर्थाने चालविली जाते. या संस्थेच्या मदतीसाठी रत्नागिरीतील माया

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language